पुणे : महाराष्ट्रातील ख्रिस्ती बांधवांना राजकीय प्रतिनिधित्व तसेच स्वतंत्र महामंडळ देण्याची मागणी द्रमुकचे राज्यसभा खासदार पी. विल्सन यांनी रविवारी केली.रिजनल ख्रिश्चन सोसायटीच्या वतीने लुकास केदारी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित सहाव्या ख्रिस्ती हक्क परिषदेचे उद्घाटन पी. विल्सन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
पुणे प्रांताचे धर्मगुरू फादर रॉक अल्फान्सो, पास्टर पीटर जॉर्ज, सतीश मेहेंद्रे, आमदार बापू पठारे, सिस्टर दिव्या, फादर विजय नायक, माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे, जॉन फर्नांडिस, फादर जो गायकवाड, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, मुस्लिम कॉन्फरन्सचे अध्यक्ष. झुबेर मेमन, आम आदमी पक्षाचे सुदर्शन जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते हुलगेश चलवादी, उद्योजक नितीन काळे, शिरीष हिवाळे, ख्रिस्ती लिगल असोसिएशनचे ॲड. बाजीराव दळवी या वेळी उपस्थित होते. दिलीप नाईक परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. अल्पसंख्याक मंत्री दत्ता भरणे यांनी दूरभाष पद्धतीने सहभाग घेत ख्रिस्ती समाजाचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. बिशप डाॅ. थॉमस डाबरे यांनी परिषदेला शुभेच्छा संदेश दिला.