लोणावळा : केंद्रातील भाजप सरकार हे प्रादेशिक पक्षांना संपविण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. जो त्यांच्या सोबत जातो त्यांना मदतीचा हात देण्याऐवजी त्या व्यक्तीचा रस्ता बंद करायचा अशी राजकीय कपटनीती भाजपची आहे. आमच्या शिवाय दुसरा कुठलाच पक्ष आम्ही ठेवणार नाही असे देखील भाजपने भाष्य केले आहे. त्याचाच भाग म्हणजे शिवसेनेवर घाव घालण्याची तयारी त्यांनी केली आहे. असे वक्तव्य शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. त्या लोणावळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. 

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, शिवतीर्थावर जसा विजयादशमीला मेळावा होतो तसे इतरांचे देखील कार्यक्रम झालेले आहेत. भगवान गड, धम्मचक्र परिवर्तन दिन असतो, या कार्यक्रमांना हजारो नागरिक जमतात पण त्यांचा एकमेकांमध्ये संघर्ष नसतो. आमचे ध्येय पक्के आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक ही शिवसेनेची परंपरा असलेला विजयादशमीचा मेळावा पुढे घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे. आमची भूमिका प्रबोधनकारी हिंदुत्ववाची आहे.

हेही वाचा : पुण्यात करोना काळात ३६१४ बेकायदा बांधकामे ; पीएमआरडीएसमोर कारवाई करण्याचे आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे यांनी गेल्या दहा वर्षात ज्या प्रकारे शिवसेनेचा स्वतंत्र बाणा पुढे घेऊन जात असताना आम्हाला राजकारणात गृहीत धरू नका अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे. तिचा आदर जनतेने केलेला आहे. पण काही अडचणी आहेत, खास करून दिल्लीतील केंद्रातील भाजप सरकारचा प्रादेशिक पक्ष संपविण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. जो त्यांच्या सोबत जातो त्यांना मदतीचा हात देण्याऐवजी त्या माणसाचा रस्ता बंद करायचा ही कुठली राजकीय कपटनीती आहे?, हा संशोधनाचा विषय आहे. असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.