येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. बालभारती हा पुस्तक निर्मिती करणारा विभाग असला तरी पुढील काळासाठी चित्रफितीद्वारे लहान मुलांना शिक्षणाची सोय करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा >>>“…तर मी माझ्या मिशा काढेन!” नितीन गडकरी यांनी धीरुभाई अंबानी यांना दिलं होत चॅलेंज; वाचा संपूर्ण किस्सा

बालभारतीच्या ५६ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात केसरकर बोलत होते. शालेय शिक्षण सचिव रणजित सिंग देओल, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, उपसंचालक औदुंबर उकिरडे आदी या वेळी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘परीक्षा पे चर्चा -२०२३’ या विषयावरील थेट प्रसारित मार्गदर्शनपर भाषण विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. किशोर विभागाच्या नूतनीकरणाचे उद्घाटनही केसरकर यांच्या हस्ते झाले.

हेही वाचा >>>“पुण्यात शुद्ध हवा असायची, आता प्रदूषण आणि वाहतूक कोंडी”; नितीन गडकरी यांनी व्यक्त केली खंत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केसरकर म्हणाले, आपल्या जीवनात बालभारतीचे एक आगळे वेगळे स्थान आणि महत्व आहे. बालभारतीचे आजवरचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे आहे. नवीन शैक्षणिक धोरणातून विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्व विकास करून देशाचे नेतृत्व करावे. अभियंता, डॉक्टर हे करिअरचे एकमेव क्षेत्र नसून विद्यार्थ्यांनी आपले आवडीचे क्षेत्र निवडून त्यात उत्कृष्ट काम करावे. विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेचा तणाव न घेता परीक्षांना चांगल्या प्रकारे सामोरे जाऊन यशस्वी व्हावे.