पुणे : पुणे पोलिसांच्या परिमंडळ पाचमधील अवैध व्यवसाय करणाऱ्या आठ गुन्हेगारांना तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी दिले. मुंढवा, बिबवेवाडी, मार्केटयार्ड , तसेच हडपसर पोलीस ठाण्यातील गुंडांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. आंदण चिंतामणी गायकवाड (वय ५३, रा. आनंद निवास, मुंढवा), आतिष सूरज बाटुंगे (वय २५, रा. केशवनगर, मुंढवा), विजय सिद्धाप्पा कटीमणी (वय ३५, रा. झांबरे वस्ती, अप्पर इंदिरानगर ), रवी मारुती चक्के (वय ३०, रा. दांगट वस्ती, हडपसर), शांताबाई यल्लपा कट्टीमणी (वय ५२, रा. बालाजीनगर, घोरपडी ), कन्या अभिमन्यू राठोड (वय ३५, रा. गव्हाणे वस्ती, बिबवेवाडी), दिलेर अन्वर खान (वय ३४, रा. मार्केटयार्ड), बापू अशोक जाधव (वय ४७, रा. केशवनगर, मुंढवा) अशी तडीपार करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.

हेही वाचा >>> शहरबात : ‘मिशन ३२’ मोहीम फत्ते होणार कशी? वाहने ३९ लाख; वाहतूक पोलीस अवघे ९००

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातून त्यांना तडीपार करण्यात आले. आरोपी सराइत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध अवैध व्यवसाय केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. गायकवाड, बाटुंगे, विजय कट्टीमणी आणि चक्के यांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले. तसेच, शांताबाई, कन्या आणि दिलेर यांना एक वर्षांसाठी, तसेच जाधव याला सहा महिन्यांसाठी ही कारवाई करण्यात आली. या कालावधीत आरोपी कोणाला दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.