पुणे : पुण्यातील लष्कर भागातील प्रसिद्ध कयानी बेकरीच्या नावाने बनावट संकेतस्थळ उघडून सायबर चोरट्यांनी ग्राहकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत कयानी बेकरीचे मालक रुस्तम कयानी यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे.
कयानी बेकरीच्या नावाने सायबर चोरट्यांनी बनावट संकेतस्थळ उघडले. ग्राहकांनी या संकेतस्थळावर ऑर्डर नोंदविल्या होत्या. ऑनलाइन पद्धतीने ग्राहकांनी या संकेतस्थळावर ऑर्डर दिल्या होत्या. दरम्यान, संकेतस्थळावरील कयानी बेकरीचा मोबाइल क्रमांक सायबर चोरट्यांचा आढळून आले. चोरट्यांनी या क्रमांकाद्वारे ग्राहकांकडून पैसे उकळले आहेत. चोरट्यांनी आतापर्यंत ग्राहकांची हजारो रुपये उकळले असल्याचे रुस्तम कयाानी यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
हेही वाचा : शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार याची पोलिसांनी काढली धिंड
कयानी यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेद्र मोरे चौकशी करत आहेत. अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही.