scorecardresearch

वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर डॅाक्टर तरुणीचा विनयभंग

याबाबत एका डॅाक्टर तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर डॅाक्टर तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका डॅाक्टर तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात जात होती. त्या वेळी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकीवरुन आलेल्या एका तरुणाने तिला अडवले. तरुणाने तिच्याशी असभ्य वर्तन केले. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर दुचाकीस्वार तरुण पसार झाला. त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. बंडगार्डन पोलिसांकडून तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Female doctor s molestation in front of the entrance of the medical college pune print news zws