पुणे : येरवडा कारागृहात प्रतिस्पर्धी गटाला माहिती दिल्याच्या संशयातून कैद्याला तिघांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी तीन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

श्रीकांत राजेंद्र काळे, संजय हरिष भोसले, आकाश मंगेश सासवडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्यांची नावे आहेत. याबाबत येरवडा कारागृहातील अधिकारी रेवनाथ कानडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवडा कारागृहातील सीजे विभागातील बॅरेक क्रमांक एकच्या परिसरात १४ जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मारहाणीची घटना घडली होती. कैदी योगेश जगदीश सोनवणे बराकीत बसला होता. त्यावेळी आरोपी काळे, भोसले, सासवडे यांनी सोनवणेला बराकीच्या बाहेर बोलावले.

हेही वाचा – ‘एल थ्री’ बारमधील पार्टीत मुंबईतून मेफेड्रोनचा पुरवठा; संगणक अभियंता तरुणासह दोघे अटकेत

हेही वाचा – पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील ‘एल थ्री’ बारच्या मालकासह दोघांविरुद्ध आणखी एक गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रतिस्पर्धी गटाला माहिती देतो, असे सांगून आरोपींनी सोनवणेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बराकीत हाणामारी झाल्याची घटना घडल्यानंतर बंदोबस्तावरील रक्षकांनी काळे, भोसले, सासवडे यांना ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक अहिरे तपास करत आहेत.