पुणे : येरवडा कारागृहात दोन कैद्यांनी एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी येरवडा पोलिसांकडून दोन कैद्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुकुल रेवणसिद्ध कांबळे आणि सुशांत सुरेश शिंदे (दोघे रा. दत्तनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्यांची नावे आहेत. याबाबत अजय उर्फ पपड्या शामराव सोनवणे (वय २४, रा. गेवराई, बीड) याने फिर्याद दिली आहे. सोनवणे सकाळी आंघोळीसाठी गेला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या वेळी तू आमच्या मित्राला का मारले, अशी विचारणा कांबळे आणि शिंदेने त्याच्याकडे केली. दोघांनी सोनवणेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तसेच सोनवणेला दगड फेकून मारला. येरवडा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.