समाजमाध्यमावर झालेल्या ओळखीतून वकिलाने तरुणाची सहा लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी ॲड. दशरथ वावकर (वय २७, रा. ताथवडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ॲड. वावकर आणि तक्रारदार तरुणाची समाजमाध्यमावरुन ओळख झाली. ॲड. वावकर आणि तरुणाची मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर दोघे जण एकमेकांच्या संपर्कात आले. ॲड. वावकर याने विवस्त्रावस्थेत छायाचित्रे काढून तरुणास धमकावण्यास सुरुवात केली. छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली.

हेही वाचा >>> पुणे : जिल्ह्यातील १०६१ ग्रामपंचायतींना आंतरमहाजाल सेवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर ॲड. वावकर याने आई आजारी असल्याची बतावणी करुन तरुणाची आई आणि पत्नीचे २० तोळ्यांचे दागिने घेतले. दागिने तारण ठेवून पिंपरीतील एका खासगी वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले. तक्रारदार तरुणाला धमकावून त्याच्याकडील वाहन परवाना, पारपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड, एटीएम कार्ड काढून घेतले. ॲड. वावकरच्या त्रासामुळे तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. ॲड. वावकरने लैंगिक अत्याचार करुन फसवणूक केल्याचे तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव तपास करत आहे