पुणे : हडपसर भागातील रामटेकडी परिसरात भंगार मालाच्या गोदामाला आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली. गोदामातील प्लास्टिकने पेट घेतल्यानंतर धूर झाला. आग भडकल्याने परिसरात घबराट उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन तासाभरात आग आटोक्यात आणली.

रामटेकडी भागात भंगार मालाच्या गोदामाला आग लागल्याची घटना शनिावरी रात्री आठच्या सुमारास घडली. रामटेकडी भागात दाटीवाटीने घरे आहेत. गोदामात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, तसेच अन्य साहित्य ठेवले होते. प्लास्टिकने पेट घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर धूर झाला, तसेच आग भडकली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी प्रमोद साेनवणे, अनिल गायकवाड यांंच्यासह जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी सहा बंब, टँकर दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटेक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र, प्लास्टिकने पेट घेतल्याने आग आटोक्यात आणणे अवघड झाले. जवानांनी गोदामावर चहुबाजूंनी पाण्याचा मारा करुन तासाभरानंतर आग आटाेक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी प्रमोद साेनवणे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोदामात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक असल्याने रात्री उशीरापर्यंत जवान तेथे थांबले होते. आग पूर्णपणे आटोक्यात आल्याची खात्री झाल्यानंतर पुन्हा पाण्याचा मारा करण्यात आला.