पुणे : पावसाळ्यामुळे खोल समुद्रातील मासेमारी बंद झाल्याने किनारपट्टीवर मच्छीमारांच्या नावा परतू लागल्या आहेत. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने मासळीच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हेही वाचा - “असाच फिट राहिलो तर ८० नाही…” अभिनेता सुनील शेट्टीचं वक्तव्य चर्चेत चिकनच्या दरात किलोमागे १० रुपयांनी वाढ झाली आहे. इंग्लिश अंड्याच्या दरात शेकड्यामागे ३५ रुपयांनी वाढ झाली आहे. मागणीअभावी गावरान अंड्यांच्या दरात शेकड्यामागे ३० रुपयांनी घट झाली आहे. मटणाचे दर स्थिर आहे. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी ५ ते ६ टन, खाडीतील मासळी २०० ते ४०० किलो, नदीतील मासळी एक ते दीड टन, तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सिलनची एकूण मिळून १५ ते २० टन आवक झाली, असी माहिती मासळी विक्रेते ठाकूर परदेशी, चिकन विक्रेते रुपेश परदेशी आणि मटण विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.