पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या प्राचार्य गटातील पाच जागांवर बिनविरोध निवड झाली आहेत. उर्वरित पाच जागांसाठी रविवारी पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील तीन ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये २९८ प्राचार्यांपैकी २८४ प्राचार्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा टक्का ९५ टक्के होता. त्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा >>> राज्य नाट्य स्पर्धेत भाजपचा हस्तक्षेप; राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यापीठाच्या अधिसभेत प्राचार्य गटाच्या एकूण दहा जागा आहेत. त्यातील खुला प्रवर्ग वगळता आरक्षित प्रवर्गातील पाच जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर एस.टी प्रवर्गाची जागा रिक्त राहिली आहे. एस.सी. प्रवर्गातून डॉ. देविदास वायदंडे, ओबीसी प्रवर्गातून डॉ. वैभव दीक्षित, एन. टी. प्रवर्गातून डॉ. गजानन खराटे, तर महिला प्रवर्गातून डॉ. क्रांती देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर खुल्या प्रवर्गातील उर्वरित पाच जागांसाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत. पुण्यातील मतदारांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील पर्यावरणशास्त्र विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते. याठिकाणी १४४ पुरुष आणि २८ महिला अशा एकूण १७२ प्राचार्यांनी मतदान केले. नगरमध्ये ३५ पुरुष आणि ४ महिला अशा एकूण ३९ मतदारांनी, तर नाशिकमध्ये ६३ पुरुष आणि १० महिला अशा एकूण ७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे एकूण २९८ मतदारांपैकी १४ मतदार मतदानासाठी गैरहजर राहिले. तर २८४ जणांनी मतदान केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी (२९ नोव्हेंबर) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होईल.