लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सत्ताधाऱ्यांकडून सक्तवसूली संचालनलायासारख्या (ईडी) केंद्रीय संस्थांचा गैरवापर केला जात असल्याची सातत्याने टीका करण्यात येते. अनेक नेत्यांना ईडीच्या चौकशीची भीती असल्याचीही चर्चा होते. मात्र आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि माजी नगरसवेक वसंत मोरे यांनी ईडीला खोचक टोला हाणला आहे.

आणखी वाचा-‘स्वारगेट – मंत्रालय’ नवी हिरकणी सेवा सुरू

vasant more facebook
ईडीसंदर्भात वसंत मोरे यांनी समाजमाध्यमांत काही छायाचित्रांसह पोस्ट केली आहे.

ईडीसंदर्भात वसंत मोरे यांनी समाजमाध्यमांत काही छायाचित्रांसह पोस्ट केली आहे. त्यात वसंत मोरे एका गाडीसह उभे आहेत आणि गाडीची काही छायाचित्रे आहेत. या पोस्टमध्ये वसंत मोरे म्हणतात, ‘ऑडी जुनीच आहे फक्त कलर नवीन केलाय, नाहीतर खासदारकीला नाव आलंय उगाच गैरसमजाने गाडी पाहून ईडी वाले यायचे घरी..’

वसंत मोरे यांच्या या पोस्टला समाजमाध्यमातून मोठी दाद मिळत आहे. अनेकांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट केली आहे.