आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला साडेतीनशे पेक्षा जास्त जागा तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) चारशे पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा खासदार, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. देशाला विकसित भारत करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली असून २०२४ च्या निवडणुकीनंतर विकासाची गती वाढेल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पुणे: शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीत पक्षांतर्गत लढाई…उमेदवारीसाठी ‘या’ नावांची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत खासदार प्रकाश जावडेकर बोलत होते. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस, माजी महापौर मुरलीधर मोहोळ,माजी आमदार आणि राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष प्रा. मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

जावडेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात गेली नऊ वर्षे एका पक्षाचे पूर्ण बहुमत असलेले राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे भारताला स्थिरता, विकास, गरीब कल्याण आणि जगात मानाचे स्थान मिळाले. लोकांचा नरेंद्र मोदींवरील विश्वास हीच पक्षाची ताकद आहे. सन २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत ३५० पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाला आणि एनडीए ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळतील.  पंतप्रधान मोदी यांनी विकासाचे सकारात्मक राजकारण केले.

हेही वाचा >>> दहावीतील गुणफुगवटा ओसरला; गुणवंतांमध्ये घट, चार वर्षांतील नीचांकी निकाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकासाचा लाभ देण्यात जात, धर्म, प्रांत, लिंग, मतदाराचा कल या कोणत्याही कारणावरून भेद केला नाही. जनतेनेही स्वच्छ भारत, डिजिटल भारत, नागरिकांनी मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, शाश्वत विकास, घर घर तिरंगा अशा अनेक योजनांमध्ये सहभाग घेतला. जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारा देश भारत ठरला आहे. जेव्हा अमेरीका, चीन, युरोप यांचा विकासाचा वेग दोन ते चार टक्के असताना भारताच्या विकासाचा वेग सात टक्के आहे. जागतिक बँक, मॉनिटरी फंड, मॉर्गन स्टॅन्ले सारख्या संस्थांच्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. युरोप मधील अनेक देशात मंदीचे सावट आहे, पण भारताची वेगवान प्रगती चालू आहे आणि गरीबी एक टक्के पेक्षा कमी आणि बेरोजगारींचा दर ही कमी झाला आहे. नऊ वर्षातील कामाचा अहवाल २० कोटीहून अधिक घरी जाऊन कार्यकर्ते देणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.