लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरातीस चार गुंडांना शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिले.

अजय राजेंद्र माकर (रा. गोरे वस्ती,वाघोली), रोहित दत्ता मंजुळे (रा. वाघोली),आकाश राजू दंडगुले (रा. वाघोली), हर्षद कुमार शिंदे (रा. लोणीकंद) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. माकर टोळीप्रमुख आहे असून, माकरसह साथीदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. माकर आणि साथीदारांच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देत नव्हते. त्यांना शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव लोणीकंद पोलिसांनी तयार केला होता.

आणखी वाचा-नात्यातील तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; धमकावून ३० लाख रुपये उकळले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मारूती पाटील, सीमा ढाकणे, उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी आदींनी ही कारवाई केली.