scorecardresearch

श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात, डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठापना

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळचे यंदाचे १३१ वे वर्ष आहे.

dagadusheth-halwai-ganpati
या मिरवणुकीचे दृश्य टिपण्यासाठी हजारो पुणेकर भाविकांचे मोबाईल सरसावाल्याचे पाहण्यास मिळाले.(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळचे यंदाचे १३१ वे वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामधून मिरवणुकीला सुरुवात झाली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते सकाळी १० वाजून ३० वाजता प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून हनुमान रथातून श्रीं च्या आगमन मिरवणुकीला श्री हनुमानाच्या ४ मूर्ती असलेल्या फुलांच्या रथातून सुरवात झाली आहे. या मिरवणुकीचे दृश्य टिपण्यासाठी हजारो पुणेकर भाविकांचे मोबाईल सरसावाल्याचे पाहण्यास मिळाले.

Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
World Cup 2023 Updates
World Cup 2023: सूर्याला विश्वचषकाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी पाहावी लागेल वाट, सुनील गावसकरांनी सांगितले कारण
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र
thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन

आणखी वाचा-पुणे: गणेशभक्तांनी खुशखबर! गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोच्या वेळेत वाढ; जाणून घ्या नवीन वेळापत्रक

ही मिरवणुक मुख्य मंदिरपासून अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपाकडे मार्गस्थ झाली आहे. देवळणकर बंधूचा चौघडा,गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि गंधाक्ष ढोल ताशा पथक मिरवणुकीत सहभागी झाली आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ganeshotsav 2023 srimant dagadusheth ganpati procession is begins svk 88 mrj

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×