खगोलशास्त्रासारखा किचकट विषय सोप्या शब्दांत मांडण्यासाठी पुण्यातील श्वेता कुलकर्णी या तरुणीने AstronEra या ऑनलाईन संकेतस्थळाची स्थापना केली आहे. या माध्यमातून श्वेता खगोलशास्त्र या विषयाला कलात्मक पद्धतीने लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करते. श्वेताने हा पुढाकार ग्रामीण भागातील मुलांसाठी देखील घेतला आहे.

‘आंतरराष्ट्रीय अ‍ॅस्ट्रोनॉमिकल युनियन’ कडून सलग दुसऱ्यांदा अ‍ॅस्ट्रॅान एराची निवड झाली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचे धडे दिले जाताहेत. सर्वसामान्यांमध्ये कुतूहल निर्माण करणाऱ्या अ‍ॅस्ट्रॅान एराच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊ.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.