धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यानिमित्त शनिवारी (१५ ऑक्टोबर) पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या मैदानात ॲड. प्रकाश आंबेडकर यांची सायंकाळी सहा वाजता जाहीर सभा होणार आहे. या विराट धम्म मेळाव्याद्वारे प्रकाश आंबेडकर जनतेशी संवाद साधणार आहेत.

हेही वाचा >>> पुणे : अतुल देऊळगावकर यांना न. चिं. केळकर पुरस्कार जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय बौद्ध महासभा, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, बौद्ध समाज विकास महासंघ,बानाई आणि बौद्ध विहारांच्या वतीने आयोजित धम्म मेळाव्यास भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर, अंजली आंबेडकर, बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर, रेखा ठाकूर,अशोक सोनाने, राजेंद्र पातोडे, भिकाजी कांबळे, एस. के.भंडारे, अनिल जाधव, नीलेश विश्वकर्मा ,अमित भुईगल, देवेंद्र तायडे, दिशा शेख,डॉ. धैर्यशील फुंडकर, लता रोकडे, शमिभा पाटील, रोहिणी टेकाळे, अनिता सावळे, चंद्रकांत लोंढे उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे डी. व्ही. सुरवसे आणि प्रियद्रशी तेलंग यांनी दिली.