समाजमाध्यमात दहशत निर्माण करण्यासाठी ध्वनिचित्रफीत (रिल्स) प्रसारित करणाऱ्या सराईतास पोलिसांनी धडा शिकवला. याप्रकरणी तरुणाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पवन संतोष भारती (वय २०, रा. मोहम्मदवाडी, हडपसर) असे कारवाई करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पवनविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> खुशखबर! पिंपरी-चिंचवडकरांची तहान भाविणारे पवना धरण शंभर टक्के भरले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी पवनविरुद्ध तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्याने समाजमाध्यमात ध्वनिचित्रफीत प्रसारित केली होती. ‘हे हडपसर गाव आहे, येथे दुनियादारी नाही, तर येथे गुन्हेगारी चालती बादशहा’, असा संवाद ध्वनिचित्रफितीत पवनने टाकला होता. ध्वनिचित्रफीत प्रसारित झाल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाचे वरिष्ठ निरीक्षक रजनीश निर्मल आणि पथकाने पवनचा शोध घेण्यास सुरुवात केली. तो शिंदे वस्ती भागात थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला.