विवाह होऊन अवघे तीनच महिने झाले असताना डॉक्टर पत्नीचा अभियंता असलेल्या पतीकडून कौटुंबिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. छळामुळे पत्नी तिच्या माहेरी रहात असताना पत्नी आणि तिच्या आईची समाजमाध्यमावर बदमानीही करण्यात आली. याबाबत भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. किशोर लगे (रा. संगमनेर, अहमदनगर) याच्यावर या प्रकरणी कौटुंबिक छळासह माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २८ वर्षीय डॉक्टर तरुणीने फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>> चाकणला सराईत गुन्हेगाराचा खून; १३ जणांवर गुन्हा

ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
Accused in gang rape case
सामूहिक बलात्कार प्रकरणातील नऊ वर्ष पसार असलेल्या आरोपीला अटक
ससूनमध्ये नेमकं काय घडलं? उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू नव्हे तर दुसरेच कारण

हेही वाचा >>> चिंचवड उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाचा विवाह किशोर लगे याच्याशी जानेवारी २०२१ मध्ये झाला होता. मात्र, पुढील तीनच महिने त्यांचा संसार टिकला. पती सातत्याने संशय घेऊन छळ करीत असल्याने ती माहेरी गेली. मात्र, त्यानंतरही तो सातत्याने तिला मारण्याची धमकी देत होता. त्याचप्रमाणे तिच्या मैत्रिणीजवळ तिची बदनामी करीत होता. डॉक्टर पत्नी आणि तिच्या आईचे लगे याने समाजमाध्यमावर बनावट खाते तयार केले होते. त्यातून दोघींची बदनामी केली. ही बाब लक्षात येताच तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विजय पुराणीक यांनी सांगितले, की दोघांनाही समुपदेशनासाठी पाठविण्यात आले होते. मात्र, त्यांच्यात समझोता झाला नाही.