पिंपरी चिंचवड : पिंपरी- चिंचवडसह मावळमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात एका दिवसात पाणी पातळीमध्ये ३.९४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज धरणातील पाणीसाठा २८.७७ टक्क्यांवर पोहचला आहे. २४ तासात धरण पाणलोट क्षेत्रात तब्बल १३२ मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झटपट वाढ झाली आहे. पाणी कपातीच मोठं संकट पिंपरी- चिंचवडकरांवरील टळलं आहे.
पिंपरी- चिंचवडकरांसाठी समाधानाची बाब म्हणजे पवना धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. धरण परिसरात आत्तापर्यंत ६६२ मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पवना धरणात १७.४३ टक्के इतका पाणी साठा होता.
हेही वाचा…लोणावळ्यात गेल्या २४ तासांत तब्बल २१६ मिलिमीटर रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद
त्यामध्ये आता ११.३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी च्या तुलनेत धरणातील पाणी साठ्याचा टक्का थोडासा खाली आहे. सतत असाच पाऊस कोसळत राहिला तर तो टक्का देखील वाढू शकतो.