पुणे : गेले दोन दिवस सायंकाळच्या सुमारास कोसळल्यानंतर सोमवारी पुणे शहरात दिवसभर पाऊस सुरू होता. तर जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार, तर घाट परिसरात पावसाची तीव्रता जास्त होती. ताम्हिणी येथे २२० मिलिमीटर, लोणावळा येथे १२३ मिलिमीटर, वळवण येथे ९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

जूनच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण विश्रांती घेतल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. गेले दोन दिवस शहर आणि जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील कुरवंडे येथे ४६.५ मिलिमीटर, लवासा येथे ३४.५, भोर येथे २४, लवळे येथे १२, तळेगाव येथे ९.५ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. तर घाट परिसरातील लोणावळा येथे १२३ मिलिमीटर, शिरगाव येथे १८०, ताम्हिणी येथे २२० मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेले दोन दिवस शहरात सायंकाळच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. मात्र, सोमवारी पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थी, पालकांना रेनकोट, छत्रीसह बाहेर पडावे लागले. सायंकाळी साडेपाचपर्यंत शिवाजीनगर येथे ५.९, पाषाण येथे ६.८, चिंचवड येथे ९, एनडीए येथे ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.