पुणे : नॅक-नॅब मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांवर आता थेट कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांना नोटिस द्यावी. दिलेल्या कालमर्यादेत प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महाविद्यालयांचे पुढील काळात नवीन प्रवेश थांबविणे, प्रवेश संख्या कमी, मर्यादित करणे, तसेच त्यांची परीक्षा केंद्रे रद्द करणे अशी कारवाई करण्याबाबत पाटील स्पष्ट केले. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागीय सहसंचालक यांची आढावा बैठक महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, विभागीय सह संचालक आदी उपस्थित होते. विद्यापीठनिहाय संलग्न महाविद्यालये, त्यापैकी नॅक मानांकन प्राप्त महाविद्यालये यांची माहिती व आढावा घेण्यात आला.

High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये मराठा संघटनांचा निषेध मोर्चा

राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने सर्व महाविद्यालयांच्या नॅक मूल्यांकनासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा. नॅक मूल्यांकनासाठी नोंदणी केलेल्या, मूल्यांकन प्राप्त आणि मूल्यांकन नसलेल्या महाविद्यालयांची माहिती, नावे विद्यापीठांनी संकेतस्थळावर अद्ययावत करून प्रसिद्ध करावी, तंत्रशिक्षण, औषधनिर्माणशास्त्राचे पदविका शिक्षण देणाऱ्या संस्थांनी राष्ट्रीय अधिस्वीकृती मंडळाकडून (एनबीए) मूल्यांकन करून घेणे आवश्यक असून त्यासाठी तंत्रशिक्षण विभागाने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही पाटील यांनी दिल्या.

हेही वाचा : ‘रेरा’ इफेक्ट! ग्राहकांच्या हाती घराच्या चाव्या वेळेतच

आकडेवारी

अनुदानित महाविद्यालये – १ हजार १७७
नॅक मूल्यांकन पूर्ण महाविद्यालये – १ हजार ११३
विनाअनुदानित महाविद्यालये – २ हजार १४१
नॅक मूल्यांकन असलेली विनाअनुदानित महाविद्यालये – २५७
एकूण शासकीय महाविद्यालये – २८
नॅक मूल्यांकन झालेली शासकीय महाविद्यालये – २४
‘ए’, ‘ए+’, ‘ए ++’ नॅक श्रेणीप्राप्त महाविद्यालये – २०२