मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने आज शनिवारी पिंपरी- चिंचवड बंद ची हाक देण्यात आली आहे. आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आज मोर्चाही काढण्यात आला. मोर्चात शेकडोच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते. सर्वपक्षीय नेत्यांनी आणि विविध असंख्य संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला होता. तसेच या मोर्चात पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदे- फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार यांचा गटही मोर्चात होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि जालना येथे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला.

हेही वाचा… जालन्यातील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये कडकडीत बंद

Map , Akola district, human chain,
मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था

हेही वाचा… “कोण म्हणेल की आमच्यातून त्यांना आरक्षण द्या”, पंकजा मुंडेंचा सवाल; म्हणाल्या, “मराठा समाजाला…!”

विविध घोषणांनी मोर्चकरांनी परिसर दणाणून सोडला. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे..अशा घोषणांनी पिंपरी मार्केट दणाणून सोडले. मोर्चाची सुरुवात पिंपरीतील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून झाली. मोर्चा डीलक्स चौक मार्गे पिंपरी मार्केट या मार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धडकला. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात केाल होता.