भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक उद्या (१८ मे) बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. या बैठकीसाठी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार असून, या बैठकीच्या निमित्ताने भाजपने बालगंधर्व रंममंदिर, जंगली महाराज रस्ता परिसरात फ्लेक्सबाजी केली आहे. त्यात पथदिव्यांच्या खांबांवरही फलक लावण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> पुणे : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध… जाणून घ्या नोंदणी कधीपासून…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या स्वागतासाठी भाजप पुणे शहर आणि स्थानिक नेत्यांकडून फलकबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिर परिसर, जंगली महाराज रस्ता फ्लेक्स आणि फलकांनी भरून गेल्याचे चित्र आहे. फलक लावण्यासाठी परवानगी मिळण्यासाठीचा अर्ज महापालिकेकडे केला असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले. तर अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले, की फलक लावण्याबाबत परवानगी घेतली आहे की नाही या बाबत क्षेत्रिय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी लागेल. परवानगी घेतली नसल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.