कोथरुडमधील गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “या घटनेमुळे राज्यात कुठेही टोळीयुद्ध होणार नाही, तसेच कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होणार नाही. सदर कुख्यात गुंडाची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली आहे. गुंड कुणीही असो, त्याचा बंदोबस्तच शासनाद्वारे केला जातो. त्यामुळे असे टोळीयुद्ध करण्याचा कुणीही प्रयत्न करणार नाही.” पुण्यात माध्यमांशी संवाद साधत असताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे वाचा >> कोथरुडमधील सराईत गुंड शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू; हल्लेखोर पसार

विनाकारण स्वतःला शहीद घोषित करू नये

रोहित पवार यांच्या कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विनाकारण स्वतःला शहीद घोषित करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यांच्या कंपनीवर छापा पडला अशी माहिती मिळत आहे, त्याच्या खोलात मी गेलेलो नाही. त्यांचा व्यवसाय आहे. व्यवसायात अशा वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. त्यांनी काही केले नसेल, तर काही होणारही नाही. विनाकारण घाबरण्याची गरज नाही.”

जितेंद्र आव्हाड यांनी विनाकारण वाद निर्माण केला

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या वादग्रस्त विधानावरही फडणवीस यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य मुर्खपणाचे होते. ‘बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ..’, अशाप्रकारचा त्यांचा स्वभाग आहे. खरं म्हणजे प्रभू श्रीराम हे सर्वांचेच आहेत. ते बहुजनांचे, अभिजनांचे, आदिवासींचे, दलितांचे अशा सर्वांचेच आहेत. ते शाकाहारी होते की मांसाहारी, या विषयात पडण्याची गरज नाही. ज्यांची प्रभू श्रीरामावर श्रद्धा आहे, अशा लोकांच्या भावनाना दुखावण्याचे काम विनाकारण केले जात आहे. आमचे वारकरी, धारकरी, टाळकरी हे सर्व बहुजन असून ते सर्व शाकाहारी आहेत, या सर्वांचा यातून अपमान नाही का झाला? विनाकारण विवाद निर्माण करून लोकांच्या भावना दुखावून राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम केले जात आहे. तसेच जे लोक स्वतःला हिंदुत्ववादी असल्याचे म्हणत होते, त्यांनी साधलेले मौन त्यांची बेगडी वृत्ती दाखवून देत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home minister devendra fadnavis reaction on sharad mohol murder in pune kvg
First published on: 05-01-2024 at 17:51 IST