पिंपरी :  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वग्राम जिल्ह्यात नेमणुकीस असलेल्या तसेच कार्यकाल पूर्ण झालेल्या राज्यातील १३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील २७ पोलीस निरीक्षकांची इतर ठिकाणी बदली झाली. राज्याच्या विविध जिल्ह्यातून २४ पोलीस निरीक्षक शहरात आले आहेत. त्यापैकी २२ निरीक्षक विदर्भातून आले असून १९ जण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातून बदली होऊन आले आहेत. तर, पिंपरी – चिंचवडमधील २७ पैकी १६ जणांची नागपूर शहरात बदली झाली आहे.

स्वग्राम जिल्ह्यात नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व ३० जून २०२४ पर्यंत किंवा त्यापूर्वी चार वर्षांपैकी तीन वर्ष कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीवर हजर झालेल्या पोलीस निरीक्षकांना घटकांतर्गत पदस्थापना देताना त्यांची मूळ जिल्ह्यात नेमणूक झाली असेल तर कार्यकारी पद देता येणार नसल्याचे बदली आदेशात म्हटले आहे.विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी मंगळवारी दि. ३० बदलीचे आदेश दिले आहेत.

The plight of workers in coalition politics in Raigarh
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरपट
thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
parful patel
प्रफुल पटेल यांना निर्दोषत्व! विमान भाडेकरार घोटाळाप्रकरणी सीबीआयकडून फाइल बंद

हेही वाचा >>>पुण्यात शाळकरी मुलाला चाकूने भोसकले; चार अल्पवयीन मुले ताब्यात

राज्याच्या विविध जिल्ह्यातील २४ पोलीस निरीक्षक पिंपरी – चिंचवडमध्ये आले आहेत. त्यामध्ये  २२ जण विदर्भातून आले असून १९ जण नागपूर शहर पोलीस दलातून बदली होऊन आले आहेत. त्यामध्ये वैजयंती मांडवधरे, विश्वनाथ चव्हाण, विनोद चौधरी, बापू ढेरे, दीपक गोसावी, प्रवीण कांबळे, प्रदीप राईनवर, अमित डोळस, संग्राम शेवाळे, अमोल देशमुख, राजेंद्रकुमार सानप, गणेश जामदार, नितीन फटांगरे, बबन येडगे, भारत शिंदे, ऋषिकेश घाडगे, भीमा नारके, भारत कराडे, गोरख कुंभार यांचा समावेश आहे. अमोल फडतरे, संदीप पाटील हे दोघे गडचिरोलीतून विजयकुमार वाकसे हे अमरावती शहर येथून तर, मालोजी शिंदे आणि धनंजय कापरे हे दोघे ठाणे शहरातून आले आहेत.

हेही वाचा >>>Pune : फक्त ६० रुपयांची पुण्यातील ही मिसळ खाल्ली आहे का? व्हिडीओ होतोय व्हायरल

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील २७ पोलीस निरीक्षकांची शहरातून इतरत्र बदली झाली आहे. त्यामध्ये सुनील गोडसे, शैलेश गायकवाड, रणजीत सावंत, दिपाली धाडगे, प्रसाद गोकुळे, सुनील पिंजण, रामचंद्र घाडगे, विश्वजीत खुळे, मच्छिंद्र पंडित, बाळकृष्ण सावंत, प्रकाश जाधव, किशोर पाटील, रूपाली बोबडे, अरविंद पवार, युनूस मुलाणी, सोन्याबापू देशमुख या १६ जणांची नागपूर शहरात बदली झाली. तर, शिवाजी गवारे, शंकर डामसे, शंकर बाबर, ज्ञानेश्वर साबळे, दीपक साळुंखे, सुनील तांबे या सहा जणांची  ठाणे शहरात, अजित लकडे, दिलीप शिंदे, शहाजी पवार यांची सोलापूरात तर अनिल देवडे छत्रपती संभाजीनगर आणि दशरथ वाघमोडे यांची गडचिरोलीला बदली झाली आहे.

आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे म्हणाले की, भाजपचा गड मानला जाणार्‍या नागपूर शहरातून १९ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवडमध्ये आले आहेत. या बदल्या संशयास्पद आहेत. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजप काहीही करू शकते.