scorecardresearch

पत्नीचा खून करून मेहुणीवर वार ; दारूड्या पतीला हडपसर पोलिसांकडून बेड्या

पुण्यातील हडपसर मधील साडेसतरानळी भागातील घटना

CRIME AND ARREST
( संग्रहित छायचित्र )

दारूच्या नशेत पट्ट्याने मारत असल्याची तक्रार आईकडे करणाऱ्या पत्नीचा पतीने चाकू भोसकून खून केल्याची घटना घडली. यादरम्यान, सोडवण्यास आलेल्या मेहुणीवरही वार करून तिला गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी रात्री साडेसतरानळी येथे घडली.

नंदिनी हनुमंत पवार (वय १९) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर, मेहुणी कोमल वैजनाथ लांडगे (वय २२, रा. साडेसतरानळी, हडपसर) या जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी हनुमंत धोंडीबा पवार (वय २२) याला अटक केली आहे. याबाबत नंदिनी यांच्या आई माणिक शिवाजी कांबळे यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी नंदिनी आणि हनुमंत यांचा विवाह झाला होता. त्यांना सहा महिन्यांची मुलगी आहे. तिला सांभाळण्यासाठी नंदिनी यांची आई तिच्यासोबत राहत होती. तसेच मोठी मेहुणी हीदेखील तेथेच राहण्यास आहे. बिगारी काम करणाऱ्या हनुमंत याला दारुचे व्यसन होते. तो पत्नीला वारंवार मारहाण करत. घटनेच्या दिवशी मंगळवारी रात्री हनुमंत हा नंदिनीला पट्ट्याने मारहाण करत असताना ती तिच्या आईला सांगत होती. याचा राग आल्याने नशेत असलेल्या हणुमंतने आईला काय सांगत आहेस, तुला आता सोडतच नाही म्हणत धारदार चाकूने वार करून तिचा खून केला. याच दरम्यान बहिणीला वाचविण्यास आलेल्या कोमल यांच्यावरही त्याने वार केले. सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ पडसळकर अधिक तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Husband arrested for killing wife in hadapsar area of pune pune print news msr

ताज्या बातम्या