पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लिहिलेल्या आक्षेपार्ह लिखाणाचा मी निषेध करतो. पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्याना मारहाण करणार्‍यांवर कोणत्याही पक्षाचा किंवा संघटनेचा पदाधिकारी असो त्याच्यावर तीन दिवसात कारवाई झाली पाहिजे. जर तीन दिवसात कारवाई झाली नाही तर, विद्यापीठ बंद करणार अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मांडली. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या हॅालची तोडफोड एप्रिल महिन्यात झाली होती. त्या तोडफोड करणाऱ्या विद्यार्थ्यांवर देखील अद्याप कारवाई झाली नाही. त्यामुळे आमच्या सर्व मागण्याची दखल विद्यापीठ प्रशासनाने घ्यावी अन्यथा तीव्र लढा उभारू असा इशारा त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाला त्यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याची घटना दोन दिवसापूर्वी समोर आली.त्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले.त्या घटनेच्या निषेधार्थ भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये काल आंदोलन करण्यात आले. त्यावेळी डाव्या संघटनेचे प्रतिनिधी आंदोलन ठिकाणी येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि घोषणा देणार्‍यामध्ये वादाचा प्रकार घडला. त्यामुळे काही विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर भाजपचे पदाधिकारी आणि डाव्या संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले.

आणखी वाचा-पुणे : एरंडवणे भागात भरधाव मोटारीची तीन शाळकरी मुलींना धडक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्व घडामोडी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ठिकाणी येऊन ज्या डाव्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांना काल मारहाण झाल्याची घटना घडली. त्या सर्वांची रोहित पवार यांनी विचारपूस करण्यासाठी आले होते. त्यावेळी रोहित पवार यांनी मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना धीर देत विचारपूस केली. तर रोहित पवार यांनी विद्यापीठ प्रशासनाला चांगलेच धारेवर धरल्याचे पाहण्यास मिळाले.