पुणे शहरात दारू पिऊन गाडी चालवत झालेल्या अपघाताच्या घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मागील सात महिन्याच्या कालावधीत एक हजार ६८४ दुचाकी आणि चार चाकी वाहन चालकांनी दारु पिऊन गाडी चालवल्याचं ( ड्रंक अँड ड्राईव्ह ) केल्याचे पुणे पोलिसांना विविध कारवाई दरम्यान आढळून आले आहेत. त्यामुळे आता या सर्वांचे तीन महिन्यासाठी वाहन परवाने रद्द होणार आहे.

या कारवाई बाबत वाहतूक पोलिस उपायुक्त रोहिदास पवार म्हणाले ” पुणे पोलिस विभागामार्फत शहरातील विविध भागात अनेक कारवाया करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दारू पिऊन वाहन चालवणार्‍या वाहन चालकावर सातत्याने कारवाई केली जात आहे. त्या कारवाई बाबत सांगायचे झाल्यास मागील सात महिन्यांमध्ये एक हजार ६८४ वाहन चालकांवर कारवाई केली आहे. या संबधीत चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, या बाबतचा अहवाल आरटीओ कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे या सर्वांचे तीन महिन्यासाठी वाहतूक परवाना रद्द होणार आहे ” .

हे ही वाचा… पिंपरी : चार वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा अन् मुख्यमंत्री म्हणतात, “पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीचोरी…”

हे ही वाचा… पुणे : लष्कर न्यायालयात मिळणार आता लवकर ‘न्याय’… घेतला ‘हा’ निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एखाद्या चालकाने आता पुन्हा म्हणजे दुसऱ्यांदा अशा स्वरूपाचा गुन्हा केलेला आढळून आल्यास सहा महिन्यांकरीता परवाना रद्द होईल. त्यानंतर तिसर्‍यांदा त्याच व्यक्तिने अशा स्वरूपाचा गुन्हा केल्यास कायमचा परवाना रद्द होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही दुचाकी किंवा चार चाकी वाहन चालकाने दारू पिऊन वाहन चालू नये, या कारवाई दरम्यान पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी वर्गासोबत वाद घालू नये, असे आवाहन देखील पवार यांनी केले.