लोणावळ्यात पर्यटकांच्या गाड्यांच्या काचा फोडून मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या आरोपीच्या मुसक्या लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आवळल्या आहेत. अखिल सलीम व्होरा याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून बारा लाखांचा मुद्देमान पोलिसांनी जप्त केला आहे.

लोणावळामध्ये मुंबई, पुणेसह महाराष्ट्रातून पर्यटक येतात. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या लोणावळ्यातील निसर्गाच सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवतात. पावसामध्ये भिजण्याचा मनसोक्त आनंद घेता असतात. त्याचबरोबर भुशी धरण, लाईन्स पॉईंट, टायगर पॉईंट या ठिकाणी जाऊन धुकं पाहतात. दरम्यान, पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाडीच्या काचा फोडून मोबाईल, रोख रक्कम, पर्स असा ऐवज चोरून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना भाजे परिसरामध्ये आरोपी अखिल सलीम व्होरा हा संशयित रित्या फिरत असल्याची माहिती मिळाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अखिल ला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचं कबूल केल आहे. आरोपीकडून सहा मोबाईल, पाच पर्स, दोन पॉवर बॅंक, घड्याळ, इनोव्ह कार असा एकूण १२ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सत्य यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या टीमने केली आहे.