कृष्णा पांचाळ

सध्या डिजिटल युगात गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलत आहे. गुन्हेगारांना पकडण्यामध्ये सीसीटीव्ही चा मोठा वाटा आहे. असं असलं तरी अजूनही रेखा चित्राच्या माध्यमातून गुन्हेगारांना पकडण्यात येत आहे. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस पदक विजेते खुशाल वाळुंजकर यांनी आत्तापर्यंत १८० आरोपींची रेखाचित्र रेखाटली असून पैकी १०० पेक्षा अधिक गुन्हेगारांना रेखा चित्राच्या माध्यमातून जेरबंद करण्यात आलं आहे.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..

पिंपरी- चिंचवड शहरासह पुणे शहरात आणि जिल्ह्यात दररोज खून, दरोडा, बलात्कार, चैन स्नॅचिंग अशा प्रकारची गुन्हे घडतात. या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात सीसीटीव्हीच महत्त्वपूर्ण योगदान आहे. प्रत्येक गल्ली बोळात आणि सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही असतोच. परंतु, काही ठिकाणी केवळ प्रत्यक्षदर्शी असतात. अशावेळी रेखाचित्र रेखाटूनच आरोपी पर्यंत पोहोचण्याचा पर्याय असतो. अशी माहिती रेखाचित्रकार खुशाल वाळुंजकर यांनी दिली. दगडाने ठेचून हत्या करण्यात येणाऱ्या मृतदेह ओळखण्यास अनेकदा अडचणी येतात. अशावेळी देखील रेखाचित्र महत्त्वाचे आणि तपासाला दिशा देणारे ठरते.

हेही वाचा… पिंपरी चिंचवडकरांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधांसाठी आता कृती आराखडा

कोविडकाळात खुशाल वाळुंजकर यांनी रेखा चित्राच विशेष प्रशिक्षण घेतलं. अगोदर पोलिसांसोबत तपास करणारे खुशाल रेखाचित्राचे प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वतः पोलिसांना रेखा चित्राच्या माध्यमातून आरोपी पर्यंत पोहोचवत. खुशाल हे २००८ ला पोलीस भरती झाले. पुणे शहरातून त्यांनी आपल्या नोकरीला सुरुवात केली. खुशाल यांनी आत्तापर्यंत १८० गुन्ह्यातील आरोपींची रेखाचित्र रेखाटले असून १०० पेक्षा अधिक गुन्हेगारांना रेखा चित्राच्या माध्यमातून जेरबंद करण्यात यश आलं आहे. त्यांच्या या कामगिरीचे विशेष कौतुक करत त्यांना पोलीस पदक देखील प्रदान करण्यात आलं होतं.

हेही वाचा… पिंपरी : निगडीपर्यंत मेट्रो कधीपर्यंत धावणार? ‘इतक्या’ कोटींची निविदा प्रसिद्ध

खुशाल वाळुंजकर यांनी सांगितलं की, माझ्या आयुष्यात जेजुरीची केस आव्हानात्मक होती. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. तो तपास अत्यंत आव्हानात्मक होता. आजीसह जात असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत आरोपी सहभागी झाला. काही वेळानेच निर्जन ठिकाणी अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे सुरू केले. ही बाब अल्पवयीन मुलीने आजीला सांगितली. मात्र, आरोपीने आजीला बेदम चोप देऊन त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्या ठिकाणी सीसीटीव्ही आणि इतर कोणी नव्हतं. रेखाचित्र रेखाटण्यासाठी मला बोलावण्यात आले. पीडित अल्पवयीन मुलगी आणि आजीने सांगितलेल्या वर्णनावरून आरोपीचे रेखाचित्र बनवण्यात आले. अवघ्या काही तासातच पोलिसांनी त्या आरोपीच्या मुस्क्या आवळल्या. डिजिटल युगातही रेखाचित्र महत्त्वाच ठरत असून आरोपींना फासापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. त्यामुळे खुशाल वाळूंजकर यांची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे.