पिंपरी- चिंचवड: भाजपसोबत जाण्याचा विचार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते पिंपरी- चिंचवड मध्ये बोलत होते. सत्तेसाठी भाजपसोबत बसायचे हा विचार काँग्रेस पक्षाचा नाही, संधी साधूपणाचे राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचे नाही, त्याच दृष्टीने पाऊल टाकायची आहेत, असं देखील शरद पवार यांनी स्पष्ट केलं. शरद पवार हे पिंपरी- चिंचवड मध्ये पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

शरद पवार म्हणाले, भाषण करताना कुणी तरी सांगितले की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या. सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता करायचे कारण नाही. पण सगळे म्हणजे कोण?. गांधी- नेहरू चव्हाण यांचा विचार, फुले शाहू आंबेडकर यांचा विचार आणि हे सगळे असतील तर मला मान्य आहे. पण सत्तेच्यासाठी भाजप बरोबर जाऊन बसायचे ही भूमिका कुणी मांडत असेल हा विचार काँग्रेसचा विचार नाही.

त्यामुळे कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने संधी साधूपणाचे राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचे नाही. त्या दृष्टिकोनातून पावले आपल्याला टाकायची आहेत, असं शरद पवार यांनी स्पष्ट करत भाजप बरोबर जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

भाजप बरोबर सत्तेसाठी जायचे हा विचार काँग्रेसचा नसल्याचे स्पष्ट करतानाच आपण भाजप बरोबर जाणार नसल्याची स्पष्ट भूमिका पवार यांनी घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.