पिंपरी- चिंचवड: शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी आज आमदार रोहित पवार यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. यावेळी रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेत कर्जमाफीबाबत आमचा संघर्ष सुरू राहील. सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू अस मत व्यक्त केलं आहे. आमदार रोहित पवार देहूमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

आगामी महानगर पालिका निवडणुकीसाठी महायुतीमध्ये ऐकला चलोची भूमिका तिन्ही पक्षांनी घेतल्याचं चित्र दिसत आहे, असं रोहित पवार म्हणाले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पक्षाला कुणकुण लागलेली आहे. भाजपने दोघांना वेगळं लढण्यास सांगितलं असून असे आदेश दिल्लीवरून भाजपला असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. ही भाजपची २०२९ ची तयारी सुरू आहे. दोन्ही पक्षातील आमदार भाजपातील प्रवेश करतील अस भाकीत ही रोहित पवारांनी केलं आहे. पुढे ते म्हणाले, पुण्याची ओळख ही सांस्कृतिक राजधानी म्हणून होती. आता महाराष्ट्रात गुन्हेगारीत आणि भ्रष्टाचारात अव्वल आलं आहे. काही ठराविक लोकांना हे सरकार पोसत आहे. असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्याचा रोहित पवारांनी निषेध केला आहे. बच्चू कडू हे आक्रमक नेते आहेत. परंतु, आपण संविधानानुसार चाललं पाहिजे. आमदारांना मारणे, कापा- कापी करणे अशी भाषा त्यांनी करू नये. अस ही रोहित पवारांनी बच्चू कडू यांच्याबाबत ठणकाहून सांगितलं आहे. पुढे ते म्हणाले, पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव चर्चेला आहे. महाराष्ट्रातील महत्वाच्या मंत्र्यांच्या नातेवाईकांची भागीदारी आहे. अस ही रोहित पवार म्हणाले.