scorecardresearch

Premium

पिंपरी : तळवडे दुर्घटनेतील आणखी दोघांचा मृत्यू; मृतांची एकूण संख्या ८, तर इतर ८ जणांची प्रकृती चिंताजनक

घटनेतील १० जखमी रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी आज २ जणांचा मृत्यू झाला आहे.

talwade fire incident news in marathi, talwade news in marathi
पिंपरी : तळवडे दुर्घटनेतील आणखी दोघांचा मृत्यू; मृतांची एकूण संख्या ८, तर इतर ८ जणांची प्रकृती चिंताजनक (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पिंपरी चिंचवड : तळवडे रेडझोनमधील अनधिकृत ‘स्पार्कल’ मेणबत्ती (कँडल) तयार करणाऱ्या कंपनीतील स्फोटात सहा महिला कामगारांचा काल होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. त्या घटनेतील १० जखमी रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी आज २ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर उर्वरित आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयामार्फत कळविण्यात आले आहे.

हेही वाचा : पिंपरी: महापालिका आयुक्त सल्लागारावर मेहरबान; दुसऱ्यांदा मुदतवाढ, तीन कोटी उधळणार

grah gochar march 2024
मार्च महिन्यात ग्रहांचे होणार महागोचर! ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल! नोकरी-व्यवसायात मिळेल यश
maharashtra covid marathi news, covid jn1 variant maharashtra update marathi news, covid marathi news,
राज्यात नव्या वर्षात २७०० जणांना करोनाची बाधा, ‘जे.एन.१’बाधित रुग्णांची संख्या ६६६ वर; २१ रुग्णांचा मृत्यू
palghar accident marathi news, palghar district 4 died and 7 injured, two different
पालघरमध्ये अपघातांची मालिका, दोन दिवसांत तीन अपघात; चार जणांचा मृत्यू तर सात जण जखमी
burglary
खारघरमध्ये दुपारी तीन तासांत पावणेचार लाखांची घरफोडी

यावेळी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता विनायक काळे म्हणाले की, पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयामधून काल रात्रीच्या सुमारास १० रुग्णांना उपचारासाठी पाठविण्यात आले. त्या उपचारादरम्यान आज सकाळी एक आणि दुपारच्या सुमारास एक अशा दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर उर्वरित ८ रुग्णांच्या फुप्फुसाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. त्यामुळे सर्व रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pimpri chinchwad till now total 8 workers died in talwade factory fire incident 8 serious svk 88 css

First published on: 09-12-2023 at 18:44 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×