पिंपरी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना दुय्यम लेखत कोण संजय राऊत? असे म्हणत अधिक भाष्य करणे टाळले.

आळंदीत फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. पुण्याचे पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारांची परेड काढली होती. आता जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्याची परेड काढणार का, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. या बाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, कोण संजय राऊत? कोण आहेत ते? कोणी फार मोठे नेते आहेत का? योग्य नेते असतील, त्यांच्या बद्दल मला विचारायचे. संजय राऊत यांच्याबद्दल काय विचारता?

हेही वाचा…“अयोध्येपाठोपाठ लवकरच मथुरेत श्रीकृष्ण मंदिर निर्माण होईल”; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अयोध्या, काशी, मथुरा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी मंत्री राम शिंदे यांनी अहमदनगरमधून लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्ती केली आहे. भाजपमध्ये अंतर्गत वाद आहे का असे विचारले असता उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, इच्छा असणे गैर नाही. शेवटी पक्ष निर्णय घेतो. पक्ष जो निर्णय घेईल तो राम शिंदे किंवा अन्य कोणी मान्य करतील. पुणे जिल्ह्यात दुसरे विमानतळ करण्याची तयारी सुरू आहे. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात येईल. महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ लवकरच अयोध्येला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १९ फेब्रुवारीच्या महाराष्ट्र दौऱ्याची सविस्तर माहिती आली नाही, असेही त्यांनी सांगितले.