पुणे : बालिकेवर अत्याचार करणाऱ्या रिक्षाचालकास पोलिसांनी अटक केली. राजू महादू पाटील (वय ५६, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेच्या सात वर्षांच्या मुलीला चाॅकलेट देण्याच्या आमिषाने पाटीलने रिक्षात बसवले. त्याने तिच्यावर अत्याचार केले.
हेही वाचा : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर कोट्यवधींची सट्टेबाजी; पोलिसांची सट्टेबाजांवर करडी नजर
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
घाबरलेल्या मुलीने याबाबतची माहिती आईला दिली. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी रिक्षाचालक पाटीलला अटक केली असून त्याच्याविरुद्ध अश्लील कृत्य करणे, तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अब्दागिरे तपास करत आहेत.