पुणे : येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार झाल्याची घटना उघडकीस आली. पसार झालेल्या कैद्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. आत्माराम उर्फ आत्म्या लाडक्या भवर असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. भवर हा मूळचा पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असलेल्या देवीपाडा गावचा रहिवासी आहे. २००९ मध्ये त्यााने देवीपाडा गावात एकाचा खून केला होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात न्यायालायने त्याला जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. दंड न भरल्यास सहा महिने कारवास भोगावे लागेल, अशी तरतूद न्यायालयाने आदेशात केली होती. भवर येरवडा कारागृहात होता.

हेही वाचा : पुणे: जेवण न आवडल्याने डोक्यात हातोडा घालून बांधकाम मजुराचा खून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भवरची वर्तवणुक चांगली असल्याने त्याची रवानगी कारागृह प्रशासनाने खुल्या कारागृहात केली होती. खुल्या कारागृहातील कैदी शेती करतात. शनिवारी दिवसभर भवर खुल्या कारागृहात होता. कारागृहात रक्षक तौसिफ सय्यद यांनी सायंकाळी पाचच्या सुमारास कैद्यांची हजेरी घेण्यात आली. तेव्हा भवर उपस्थित नसल्याचे आढळून आले. कारागृहातील रक्षकांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. त्यानंतर याबाबत येरवडा कारागृहातील अधिकारी हेमंत पाटील यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पसार झालेल्या भवरचा शोध घेण्यात येत असून, पोलीस नाईक जाधव तपास करत आहेत.