पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट करणे आव्हानात्मक होते. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला, तिकीट खिडकीवरही यशस्वी ठरला. सावरकरांचे व्यक्तिमत्त्व साकारून मला आपले काम करत राहण्याची प्रेरणा मिळाली, अशी भावना अभिनेते रणदीप हुडा यांनी व्यक्त केली.

एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूलच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हुडा यांची मुलाखत झाली. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. हुडा म्हणाले, की सावरकर यांना पडद्यावर साकारणे कठीण नव्हते, पण पडद्यामागे सावरकर होणे कठीण होते. या चित्रपटात दिग्दर्शक म्हणूनही बरेच प्रयोग केले. चित्रपटाच्या शेवटी प्रेक्षक टाळ्या वाजवतात हे मी या पूर्वी कधी पाहिले नव्हते. देशभरात अशा टाळ्या वाजल्या हे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा : तीन दिवस उष्णतेच्या लाटेचे; जाणून घ्या मुंबईसह मध्य महाराष्ट्रात काय होणार?

सावरकरांचे व्यक्तिमत्त्व साकारून मला आपले काम करत राहण्याची प्रेरणा मिळाली. सावरकरांना जितका मान मिळायला हवा होता तितका मिळाला नाही. या चित्रपटासाठी माझे अभिनेता, लेखक, दिग्दर्शक म्हणून कौतुक झाले याचा आनंद आहे. पण चित्रपट लेखन, स्वतः प्रमुख भूमिका करणे, त्यासाठी वजन घटवणे, दिग्दर्शन हे सारे एकावेळी करणे नक्कीच कठीण आहे, असे हुडा यांनी सांगितले.

हेही वाचा : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील करणार घरुन मतदान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते पुढे म्हणाले, सावरकरांचे राजकारण, समाज सुधारणांचे काम तेव्हाच्या काळाला अनुरूप होते. आज काळ बदलला आहे. आपल्या हातात स्मार्टफोन आले आहेत. समाजमाध्यमे आली आहेत. त्यामुळे आता प्रत्येकाच्या स्वतःच्या सुधारणा आहेत. पण सावरकरांना एकसंध भारत हवा होता. त्यात जात-धर्म देशापेक्षा मोठा नव्हता. तेच त्यांचे राजकारण होते.