पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन दिवसांपूर्वी घेतला. त्या निर्णयाचे पडसाद राज्यभरात उमटण्यास सुरुवात झाली. त्या दरम्यान शरद पवार समर्थकांनी शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी भवनसमोर अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन करताना अजित पवार यांचे नाव असलेली कोनशिला फोडली. त्यावरून अजित पवार आणि शरद पवार सर्मथकांमध्ये वादावादी देखील झाली. या सर्व घडामोडी दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज पुणे दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील अनेक घडामोडींवर प्रसार माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली.

हेही वाचा :“एवढं करुन जर मस्ती असेल तर ती पोलिसी खाक्या…”, पुण्यातील गुंडांना अजित पवारांचा थेट इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयाच्या कोनशिलेवरील तुमचं नाव हातोडी मारून काढले, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, “मी त्याला महापौर (प्रशांत जगताप) केले. मी त्याला अध्यक्ष करण्याकरिता पुढाकार घेतला. त्याला पक्षातील कोणीही सपोर्ट करत नव्हतं. माझ्याकडे आजपण त्याचा राजीनामा आहे. ‘मी एवढं काम करतोय, आंदोलन करतोय. तरी देखील सर्वजण मला त्रास देत आहेत. त्यामुळे मी राजीनामा देतो’, असं म्हणत त्याने (प्रशांत जगताप) माझ्याकडे त्याचा राजीनामा दिला होता. तो राजीनामा आजही माझ्याकडे आहे. मी जे बोलतो, ते खरं बोलतो. मला खोटं सांगून लोकांची दिशाभूल करायची नाही. त्यावेळी तो राजीनामा मी ठेवला आणि जयंत पाटील यांना सांगितले की, प्रशांत जगताप याने जरी राजीनामा दिला असला, तरी तुम्ही त्याला समजून सांगा आणि मी देखील सांगतो. एवढ्या मोठ्या परिवारात थोडसं भांड्याला भांड लागतं. त्यामुळे एवढं काही मनावर घ्यायचं काही कारण नाही. त्यामुळे मी त्याला (प्रशांत जगताप) वेळोवेळी योग्य सल्ला देण्याचं काम देखील केलं. मध्यंतरी त्याच्या वेगळ्या बातम्या देखील आल्या. तरी देखील मी त्याला सावरून घेतलं. त्याही पुढे जाऊन माझ्याकडे काही निनावी पत्र देखील आले. एखादा कार्यकर्ता आपल्यासोबत काम करत असल्यावर त्याला ना उमेद करणं किंवा उघडं पाडणं हा माझा स्वभाव नाही”, असे सांगत अजित पवारांनी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना झापल्याचे दिसून आले.