पुणे : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे हडपसर भागातील पदाधिकारी सुनील धुमाळ यांनी रेल्वेगाडीखाली आत्महत्या केल्याची घटना साडेसतरानळी रेल्वे फाटक परिसरात घडली. धुमाळ यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

सुनील मधुकर धुमाळ (वय ४५, रा. साडेसतरा नळी, हडपसर) भाजपच्या युवा मोर्चाचे पदाधिकारी होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी साडेसतरा नळी रेल्वे फाटकाजवळ रेल्वेगाडीखाली आत्महत्या केली. धुमाळ यांचा हडपसर भागात जनसंपर्क होता. मनमिळावू स्वभावाचे धुमाळ यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर कार्यकर्त्यांना धक्का बसला. त्यांच्यामागे आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, विवाहित बहीण असा परिवार आहे.

हेही वाचा : पुणे : करोना काळानंतरचा मोठा बदल… ‘याच्या’ मागणीमध्ये ३५ टक्क्यांपर्यंत वाढ!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धुमाळ यांना रेल्वेगाडी धडक दिल्याची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. धुमाळ यांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद लोहमार्ग पोलिसांनी केली आहे,अली माहिती पुणे रेल्वे स्थानक पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले.