पुणे : महापारेषणच्या जेजुरी येथील ४०० केव्ही टॉवर लाइनमध्ये बिघाड झाल्यामुळे बुधवारी रात्री पावणदहा वाजताच्या सुमारास शहरातील अतिउच्चदाब व उच्चदाबाच्या उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे कोथरूड, हडपसर, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, वडगाव धायरी, सिंहगड रस्ता, नऱ्हे, येवलेवाडी, एनआयबीएम रस्ता, पर्वती, पेशवेपार्क, मंडई, फुरसुंगी आदी भागातील सुमारे ४ लाख ५७ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठादेखील खंडित झाला.

महापारेषणकडून भारव्यवस्थापनाद्वारे पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरू करण्यात आला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून उष्णतेची लाट असल्याने विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. त्यामुळे महापारेषणच्या काही अतिउच्चदाबाचे उपकेंद्र व वीजवाहिन्यांवर ताण येत आहे. महापारेषणच्या जेजुरी ४०० केव्ही जेजुरी टॉवर लाइनमध्ये रात्री पावणेदहा वाजता बिघाड झाला. तसेच, पारेषण वाहिन्यांमध्ये विजेची तूट निर्माण झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे पारेषण यंत्रणेतील संभाव्य धोके व बिघाड टाळण्यासाठी स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा (एलटीएस) कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे फुरसुंगी, कोथरूड, नांदेड सिटी, पर्वती येथील महापारेषणच्या अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे कोथरूड, हडपसर, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, वडगाव धायरी, सिंहगड रस्ता, नऱ्हे, येवलेवाडी, एनआयबीएम रस्ता, पर्वती, पेशवे पार्क, मंडई, फुरसुंगी परिसरातील सुमारे ४ लाख ५७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला.