scorecardresearch

Premium

पुणे : गरवारे बालभवनच्या संचालिका शोभा भागवत यांचे निधन

बालमानसशास्त्राच्या अभ्यासिका, प्रामुख्याने मुलांसाठी लेखन करणाऱ्या लेखिका आणि पुण्यातील गरवारे बालभवनच्या संस्थापक-संचालिका शोभा भागवत (वय ७६) यांचे शुक्रवारी निधन झाले.

garware balbhavan founder and chaiperson shobha bhagwat passes away, shobha bhagwat passed away
पुणे : गरवारे बालभवनच्या संचालिका शोभा भागवत यांचे निधन (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे : बालमानसशास्त्राच्या अभ्यासिका, प्रामुख्याने मुलांसाठी लेखन करणाऱ्या लेखिका आणि पुण्यातील गरवारे बालभवनच्या संस्थापक-संचालिका शोभा भागवत (वय ७६) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध चित्रकार आभा भागवत या त्यांच्या कन्या होत.

पालकत्व हे शास्त्र, कला आहे आणि सतत करण्याचा आनंदाचा अभ्यास आहे, हे शोभा भागवत यांनी आपल्या कामातून पटवून दिले. पुण्यातील गरवारे बालभवनच्या त्या संचालिका होत्या. मुलांसंबंधी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. पालकत्व या विषयावर त्यांचा विशेष अभ्यास होता. पुण्यामध्ये बालभवन ही संकल्पना राबविण्यामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.

dr ashok da ranade archives, dr ashok da ranade archives pune, dr ashok da ranade archives pune information in marathi
वर्धापनदिन विशेष : प्रयोगकलांसाठी कटिबद्ध ‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काइव्हज’
bjp chief jp nadda unveils statue of ramnath goenka founder of indian express group
मुंबईच्या विकासातील योगदानाचा गौरव; ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाचे संस्थापक रामनाथ गोएंकांसह १८ विभूतींच्या पुतळ्यांचे नड्डा यांच्या हस्ते लोकार्पण
Nanosatellite launch space isro dange college ashta sangli
सांगली : आष्ट्यातील डांगे महाविद्यालय इस्रोच्या मदतीने लघु उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करणार
abvp march, Chaturshringi Temple
‘अभाविप’कडून चतुःश्रुंगी मंदिर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मोर्चा

हेही वाचा : पुण्यात व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढलं म्हणून कर्मचाऱ्याची बॉसला बांबूनं मारहाण; आयफोन फोडला!

शोभा भागवत यांची पुस्तके

  • आपली मुलं (मार्गदर्शनपर)
  • गंमतजत्रा (बालसाहित्य)
  • गारांचा पाऊस (मार्गदर्शनपर)
  • बहुरूप गांधी (अनुवादित बालसाहित्य, मूळ इंग्रजी लेखक – अनु बंदोपाध्याय) . या पुस्तकाला जवाहरलाल नेहरूंची प्रस्तावना आहे.
  • मूल नावाचं सुंदर कोडं (मुलांच्या बोलांचे संकलन)
  • विश्व आपलं कुटुंब (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक – कृष्णकुमार). – मार्गदर्शनपर.
  • सारं काही मुलांसाठी (मार्गदर्शनपर)

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune garware balbhavan founder and chaiperson shobha bhagwat passes away pune print news vvk 10 css

First published on: 08-12-2023 at 12:39 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×