पुणे : कौटुंबिक न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीत कौटुंबिक वादाचे १६ दावे निकाली काढण्यात यश आले. १६ दाम्पत्यांनी पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला.
कौटुंबिक न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश मनीषा काळे, न्यायाधीश के. व्ही. ठाकूर, न्यायाधीश एस. बी. पराते, न्यायाधीश के. ए. बागे-पाटील, न्यायाधीश संगीता पहाडे, न्यायाधीश राघवेंद्र आराध्ये, न्यायाधीश बी. डी. कदम, दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड. वैशाली चांदणे, उपाध्यक्ष ॲड. राधिका पुरोहित, निवृत्त न्यायाधीश एस. जी. तांबे, दीपक जोशी, अंजली आपटे, पी. एल. जाधव यांनी काम पाहिले. पॅनेल वकील म्हणून ॲड. मंजु लुनिया, ॲड. अनिषा फणसळकर, ॲड. झाकीर मणियार, ॲड. निवेदिता कुंटे यांनी काम पाहिले.
हेही वाचा… “मी ‘त्या’ लोकांना सोडून जाणार नाही”, आमदार रोहित पवार यांचा अजित पवारांना टोला
हेही वाचा… पिंपरी चिंचवडमध्ये पाणीटंचाई : ‘हे’ आहे कारण
किरकोळ वादातून थेट घटस्फोटाचा निर्णय घेण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या दाव्यांची संख्या वाढत असून सध्या कौटुंबिक न्यायालयात एकत्र नांदण्यासाठी आणि पोटगी मिळवण्याबाबतचे एक हजार ९२७ प्रकरणे प्रलंबित आहेत. गेल्या रविवारी झालेल्या लोकअदालतीमध्ये २१६ प्रकरणे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी १६ प्रकरणे निकाली काढण्यात यश आले. १६ दाम्पत्यांनी पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला आहे.