पुणे : घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. कांदा, वांगी, गाजरच्या दरात घट झाली असून, टोमॅटो, काकडी, मटार या फळभाज्यांच्या दरात वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२१ जानेवारी) राज्य, तसेच परराज्यांतून १०० ते ११० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.

गेल्या आठवड्यात १२५ ट्रक फळभाज्यांची आवक झाली होती. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून ४ ते ५ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो पावटा, ४ ते ५ टेम्पो घेवडा, तसेच २ टेम्पो भुईमूग शेंग, राजस्थानमधून ११ ते १२ टेम्पो गाजर, मध्य प्रदेशमधून ५ ते ६ टेम्पो लसूण, मध्य प्रदेश आणि राजस्थानातून ११ ते १२ टेम्पो मटार, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून ३० ते ३५ ट्रक बटाट्याची आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा : “…पण आम्ही महिला ‘मर्यादा पुरुषोत्तम राम’चं म्हणू”, सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

पुणे विभागातून सातारी आले ६०० ते ७०० गोणी, टोमॅटो ९ ते १० हजार पेटी, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, फ्लाॅवर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, पावटा ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, पावटा ५ ते ६ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, शेवगा २ ते ३ टेम्पो, घेवडा ५ ते ६ टेम्पो, कांदा २०० ट्रक अशी आवक झाली.