पुणे : महिलेला जाळ्यात ओढून पतीच्या मृत्यूनंतर पाच लाख रुपये आणि सोन्याच्या दागिन्यांचा अपहार, तसेच विवाहास नकार देऊन फसवणूक केल्याप्रकरणी पोली शिपायाविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेसा मारहाण, तसेच फसवणूक करणाऱ्या पोलीस शिपायाला पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिले.

तुषार अनिल सुतार असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. तो खडक पोलिस ठाण्यात नियुक्तीस होता. फिर्यादी महिला, पती आणि मुलीसह शहरातील मध्यभागात राहायला आहे. २०१९ मध्ये महिलेची पोलीस शिपाई तुषार सुतार याच्याशी समाज माध्यमात ओळख झाली. ओळखीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. विवाहित असून, मी पत्नीबरोबर राहत नाही. माझ्याबरोबर राहशील का ? अशी विचारणा सुतारने महिलेकडे केली. महिलेने त्याला नकार दिला. दरम्यान, पत्नी आणि पोलीस शिपाई सुतार यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती पतीला समजली. त्यानंतर त्याने पत्नीला घरातून बाहेर काढले. त्यानंतर सुतार, महिला आणि तिची मुलगी आंबेगाव परिसरात भाड्याने सदनिका घेऊन राहत होते. तिने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पैसे आणि दागिने परत न करता अपहार केला. विवाहाबाबत विचारणा केल्याने महिलेला मारहाण केली. त्यानंतर महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस शिपाई सुतार याच्या वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेऊन परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी त्याला पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश दिले.