Rahul Gandhi Veer Savarkar Defamation Case स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात अवमानकारक विधान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना चार ऑक्टोबर रोजी म्हणणे मांडावे लागणार आहे. गांधी यांना सोमवारी (१९ ऑगस्ट) न्यायालयात हजर राहून म्हणणे मांडण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिले होते. याप्रकरणाची सुनावणी सोमवारी झाली नाही. पुढील सुनावणी चार ऑक्टोबर रोजी होणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जैन यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. लंडनमध्ये अनिवासी भारतीयांच्या मेळाव्यात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी याबाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जैन यांच्या न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला होता. या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात अहवाल दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जैन यांनी दिले होते. याबाबतचा अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश त्या वेळी न्यायालयाने विश्रामबाग पोलिसांना दिले होते. पोलिसांनी याबाबतचा अहवाल दाखल करण्यास विलंब केल्याने न्यायालयाने नोटीसही बजाविली होती.

What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Naga Sadhus Enchant Devotees At Triveni Sangam on Makar Sankranti
संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम अभिनेत्याने प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार यांच्याबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव, म्हणाला…
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम

हेही वाचा : राहुल गांधी हाजीर हो…स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान

त्यानंतर सात्यकी सावरकर यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचा अहवाल पोलिसांनी दाखल केला. त्यावर, गांधी यांनी सोमवारी (१९ ऑगस्ट) न्यायालयात हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने दिले. गांधी यांनी त्यांचे म्हणणे न्यायालयात मांडावे, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले होते. याप्रकरणाची सुनावणी सोमवारी झाली नाही. पुढील सुनावणी चार ऑक्टोबर रोजी हाेणार आहे. त्यादिवशी राहुल गांधी न्यायालायत म्हणणे मांडावे लागणार आहे.

Story img Loader