पुणे : पुणे ते मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील सांगली ते मिरज टप्प्यातील कामाची केंद्रीय रेल्वे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग यांनी तपासणी केली. या तपासणीनंतर या मार्गावर रेल्वे गाड्या चालविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर रेल्वे गाड्यांचा वेग आता वाढणार आहे.

पुणे – मिरज हा रेल्वे मार्ग २७९.०५ किलोमीटर लांबीचा आहे. पुणे-मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू होते. त्यातील सांगली ते मिरज स्थानकांच्या दरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग यांनी सांगली ते मिरज या स्थानकांदरम्यानच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी या मार्गावर गाड्या चालविण्यास संमती दिली. त्यामुळे या मार्गावर आता गाड्यांचा वेग वाढणार आहे. या मार्गावर रेल्वे गाड्या प्रति तास ११७ किलोमीटर वेगाने धावू शकणार आहेत.

हेही वाचा : मोठी बातमी : माओवादी चळवळीतील संतोष शेलार पोलिसांना शरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक रामकरण यादव यांच्या नेतृत्वाखाली मिरज यार्ड येथे ९८ तास नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेऊन काम करण्यात आले. त्यामुळे सांगली ते मिरज हे ९.४८ किलोमीटरचे दुहेरीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. सिग्नलिंग आणि दूरसंचार विभागाचे रेल्वे कर्मचारी तसेच कंत्राटदार कर्मचाऱ्यांसह अडीचशेहून अधिक कर्मचारी या कामात सहभागी होते.

पुणे-मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरण

एकूण लांबी – २७९.०५ किमी
प्रकल्प खर्च – ४ हजार ८८२ कोटी रुपये