पुणे : पावसामुळे झाड पडून त्याखाली सापडलेली विद्यार्थीनी जखमी झाली आहे. पाषाण येथील पंचवटी परिसरातील निशिगंध इमारतीसमोर ही घटना घडली. पाषाण येथील पंचवटी परिसरात एक मोठे झाड पावसात पडले. हे झाड पडून त्याखाली एक मोटार आणि दुचाकी अडकली. सी-डॅक येथे शिक्षण घेत असलेली काजल (वय २२) ही विद्यार्थीनी झाडाखाली सापडल्याने जखमी झाली.
अग्निशमन विभागाच्या जवानांनी तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पाषाण अग्निशमन केंद्राचे अधिकारी शिवाजी मेमाणे, फायरमन जवान शशिकांत धनवटे, चंद्रकांत बुरुड, देविदास चौधरी, शुभम कारंडे, लुकमान कमलखान यांनी या कारवाईत सहभाग घेतला.