पुणे : कोरड्या हवामानामुळे शहर आणि परिसरात कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे. शुक्रवारी शिवाजीनगर, लोहगावमध्ये ३७.५, मगरपट्ट्यात ३८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील आठवडभर कमाल – किमान तापमानात वाढीचा कल कायम राहण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहर आणि परिसरात मागील चार दिवसांपासून कमाल-किमान तापमानात वाढीचा कल कायम आहे. शुक्रवारी शिवाजीनगर, लोहगावमध्ये ३७.५, मगरपट्ट्यात ३८.१, पाषाणमध्ये ३७.४, लवळेत ३८.७ अंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पुढील चार-पाच दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असल्यामुळे कमाल – किमान तापमानात वाढीचा कल कायम राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवसांत किमान तापमानात ०.५ ते १.० तर कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.

हेही वाचा : मावळात बालिकेवर अत्याचार करुन खून करणाऱ्या आरोपीला फाशी, आरोपीच्या आईला सात वर्ष सक्तमजुरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहाटेही जाणवतोय उकाडा

शहरात एकीकडे कमाल तापमानात वाढ होत असतानाच किमान तापमानातही वाढीचा कल आहे. शुक्रवारी वडगाव शेरीत सर्वांधिक २४.९, लवळे, मगरपट्ट्यात २४.०, कोरेगाव पार्कमध्ये २२.९, हडपसरमध्ये २२.१, खेडमध्ये २२.०, शिवाजीनगरमध्ये १८.५, पाषाणमध्ये १९.३, लवासात १९.० आणि हवेलीत १६.० किमान तापमानाची नोंद झाली आहे. शहराच्या उपनगरांमध्ये रात्री आणि पहाटे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.